Posts

आज पर्यंत तुम्ही मला धनंजय पंडीतराव मुंडे या नावाने ओळखता,

Image
नमस्कार!   आज पर्यंत तुम्ही मला धनंजय पंडीतराव मुंडे या नावाने ओळखता, आज पासून माझ्या आईचे नाव माझ्या वडिलांच्या नावा अगोदर लावून शासकीय कामकाजामध्ये माझे नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे असेल. आज या नावाची पाटी माझ्या मंत्रालयातील दालनात लावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व माझ्या भगिनी तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदितीताई तटकरे यांनी नव्याने राज्याचे चौथे महिला धोरण घोषित केले. त्यानुसार मी माझ्या नावात आज पासून बदल केला असून आजपासून शासकीय कामकाजात माझे नाव धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे असे असेल. या निर्णयाबद्दल माझी लहान बहीण आदितीताईचे मनःपूर्वक अभिनंदन!  Aditi Tatkare NCPSpeaks_Official

दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र.*प्रिय

Image
दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र.*प्रिय *  काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय.   परंतु त्या सुखाला तू कायमचा मुक लास. मात्र तुझ्या मृत्युमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.  त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते.  लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला होता.  शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झा...

सामान्य माणूस

🙏🏻🙏🏻 *सामान्य माणूस* महिना पगार *60,000/-* (एवढा पण खूप जणांना नसतो) म्हणजे वर्षाला *7,20,000/-* *२५* वयापासून *६०* वयापर्यंत काम, म्हणजे *३५* वर्षे काम. 7,20,000X35= 2,52,00,000/-  म्हणजे आपण *आयुष्यभर* काम करून *3 करोड* पण नाही कमवत. अजून त्यातून टॅक्स, GST च्या माध्यमातून निम्मे सरकारला परत करतो. *राजकारण्यांची मुलं .....* *रावसाहेब दानवेंचा मुलगा* २५ कोटी *पार्थ पवार:-* ७१ कोटी...  *आदित्य ठाकरे:-* ११६ कोटी...  *रोहित पवार:-* २७ कोटी *अमित शहाचा मुलगा* २०७ कोटी *सुशिल कुमार शिंदे ची मुलगी* ९३ कोटी *शरद पवारांची मुलगी १०५ कोटी (सुळे फॅमिली)* *एकनाथ शिंदेंचा मुलगा* १२३ कोटी ह्या कामदार *पोरांचा आदर्श* घेतला पाहीजे....... पहा *कमी वयात किती पैसा* कमवतात.  आणि आपण बसतो *पोस्टर चिटकावीत* आणि या *नेत्यांची हांजी हांजी* करत.. यांच्या नावाने आपल्याच *मित्रांशी, नातेवाईकांशी, शेजाऱ्याशी,आपसात* भांडत असतो.. *उदाहरण....* एका *व्यक्तीने* दुसऱ्या *व्यक्तीचा* *डोक्यात दगड* घालून *खून* केला. *मरणारा* तर मेलाच नंतर *मारणाराही* मेला. पण तो *" दगड "* मात्र तिथेच पडलाय. जगाला ओ...

ह.भ.प. करिती जातीचा जप संसाराचा फास तोडणारे महाराज जातीच्या मोह पाशात

Image
ह.भ.प. करिती जातीचा जप   संसाराचा फास तोडणारे महाराज जातीच्या मोह पाशात   टीप - सगळे नाही ..... विठोबाच्या पायरीवर संत चोखाची समाधी , जातीने महार पांडुरंग वारी करी असा एकच संत सावता बाबा जातीने माळी , जात्यावर जिच्यासोबत दळण पांडुरंगाने दळले ती संत जनाबाई मातंग आई बापाची लेक , नामदेवाच्या घरी मोलकरीण राहिली आणि संत पदाला पोहचली , अहो संत कान्होपात्राची आई गणिका , म्हणजे वेश्येची मुलगी ज्या संप्रदायाने संत पदावर आरूढ केली , संत नरहरी सोनार , संत गोरा कुंभार हे उदाहरणे मी का सांगतोय माहितीय , वारकरी संप्रदाय समता आणि मानवता शिकवताना कधीच जातीच्या मर्यादेत वेढला गेला नाही , अहो संत कबीर मुस्लीम , म्हणून गेली ८०० वर्षाचा वसा वारसा असलेला हा संप्रदाय कुठल्या एका जात धर्माच्या मर्यादेत जगाच्या कल्याणाची परिभाषा केली नाही , बुडते हे जन न देखे डोळा असाच प्रबोधनाचा कर्तव्यभार आजवर कीर्तनकारांच्या खांद्यावरून वाहिला गेला , शब्दांची फेक , गायन , वक्तृत्व सिद्धता हि कलाकारांची लक्षणे आहेत , कीर्तनकार संत यांना जात धर्माचा पाश बाधत नसतो आणि ज्या कुठल्या कीर्तनकारास जात धर्...

देशातील तरुण कोमात गेले होते

अर्ध्या तासा अगोदर देशातील तरुण कोमात गेले होते   जणू आपल्या भावकीत कोणी मेल आहे आरे क्षणभंगूर आहे रे सर्व 🤣🤣 आपली जागा कोणी तरी घेणार आहे  म्हणून कष्ट करा रे , शेवटी झुक्या भाऊ ने आपल्या देशातील लय लोकांचे जीव वाचवले त्या बद्दल धन्यवाद  पण १० ते २० दिवस बंद ठेवलं असत तर जरा जातीभेद कमी झाला असता , तरी असो देशातील युवकांना पुन्हा झुक्याभाऊ तु काम उपलब्ध करून दिल मनापासून धन्यवाद तुझ 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .

Image
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली .बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार ...

उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता.

Image
उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही. शेवटी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. मा.स...