स्मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
❤️ स्मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी..
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिचा वनडे क्रिकेटमधील जबरदस्त प्रवास सुरूच आहे. कोलंबो येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. 101 चेंडूंमध्ये 116 धावा करत स्मृतीने भारतीय संघाला 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावांपर्यंत नेले. ही धावसंख्या श्रीलंकेसाठी एक आव्हानात्मक लक्ष्य ठरली.
❤️ शतकासह मोठा विक्रम
या शतकासह स्मृतीने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. ती आता ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (15 शतके) आणि न्यूझीलंडच्या सूजी बेट्स (13 शतके) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडच्या टैमी ब्यूमोंटला मागे टाकले असून, ब्यूमोंटच्या नावावर 10 शतके आहेत.
❤️ स्मृतीची जबरदस्त खेळी
स्मृती मांधनाने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावांची खेळी केली. तिचा स्ट्राइक रेट 114.85 इतका होता. डावाची सुरुवात करताना तिने प्रतिका रावलसोबत 70 धावांची भागीदारी केली. प्रतिका 49 चेंडूंमध्ये 30 धावा करून बाद झाली.
यानंतर स्मृतीने हरलीन देओलसोबत भागीदारी करत संघाचा स्कोअर 190 पर्यंत नेला. 32.3 व्या षटकात ती देवमी विहंगाच्या गोलंदाजीवर बाद झाली. तिच्यानंतर हरलीन (56 चेंडूंमध्ये 47 धावा), कर्णधार हरमनप्रीत कौर (30 चेंडूंमध्ये 41 धावा) आणि जेमिमा रोड्रिग्ज (29 चेंडूंमध्ये 44 धावा) यांनी भारताचा डाव 300 पार नेला.
❤️ इतर फलंदाजांची कामगिरी
अमनजोत कौरने 12 चेंडूंमध्ये 18 धावा, तर दीप्ती शर्माने 14 चेंडूंमध्ये नाबाद 20 धावा केल्या. श्रीलंकेकडून 18 अतिरिक्त धावा देण्यात आल्या, त्यात 17 वाइड्स होत्या. सुगंधिका कुमारीने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी केली. तिने 10 षटकात 59 धावा देत 2 गडी बाद केले. त्याशिवाय मालकी आणि देवमी विहंगानेही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
स्मृती मांधनाची ही खेळी तिच्या करिअरमधील आणखी एक मैलाचा दगड ठरली आहे. तिच्या या फॉर्ममुळे भारतीय संघाला भविष्यातही मोठ्या विजयांची आशा आहे.
#SmritiMandhana #WomenInBlue #INDWvsSLW #WomensCricket #ODICricket #CricketRecords #MandhanaCentury
Comments
Post a Comment
JD