▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.


▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा
▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.
▪️मा.नितीनजी गडकरी साहेबांचे मनःपूर्वक आभार.
▪️सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगतच्या स्लीप रोडसह महालक्ष्मी चौकात उड्डाणपुल बांधण्यासंदर्भातील तांत्रिक शक्यता तपासण्याचे निर्देश केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दि.२७ जून २०२४ रोजी दिले होते. ही कार्यवाही पूर्ण करून बहुप्रतिक्षित असलेल्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांसह सर्व्हिस रोडच्या निविदा विभागाने काढल्या आहेत. या कामाबद्दल लोकसभा निवडणुकीत माजलगावच्या जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी बीडकारांना दिलेला शब्द पाळत वर्षभराच्या आता कामांच्या निविदा काढल्या आहेत. याबद्दल ना.नितीनजी गडकरी साहेबांसह शिफारस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. यात महालक्ष्मी चौकातील उड्डाणपुलासोबतच तेलगाव आणि पिंपळनेर रस्त्यावरील स्लिप रोडची देखील मागणी करण्यात आली होती. या पत्रांचा संदर्भ देत ना.नितीनजी गडकरी यांच्या आदेशावरून भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील प्रादेशिक अधिकार्‍यांना निर्देश दिले होते. यात उड्डाणपुल आणि स्लिप रोड संदर्भातील तांत्रिक शक्यता तपासून अहवाल सादर केला. त्यांनतर आता निविदा निघाल्या असून या कामाला गती मिळणार आहे. मागे लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान माजलगाव येथे जाहीर सभेत हा प्रश्न मार्गी लावण्याची घोषणा ना.नितीनजी गडकरी यांनी केली होती. त्यानुसार विभागाकडून पाऊले उचलली गेली. परळीत गतवर्षी शासन आपल्या दारी कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार साहेब, तत्कालीन पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्याकडे बीड शहराजवळील उड्डाणपुलांसह स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने दोघांनीही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे शिफारस केली होती. तसेच, मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी हा प्रलंबित प्रश्न ना.नितीनजी गडकरींच्या कानावर घातला होता. दरम्यान, उड्डाणपुलांसह स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लागत असल्याने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्यासह इतर नेत्यांचे जाहीर आभार.

Nitin Gadkari

#BEED #bypass

Comments

Popular posts from this blog

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!