सलाम त्या कर्तुत्वाला 🙏

पुन्हा शून्य 




लोकाशा ची शिदोरी आयुष्यभर पुरल
नाळवंडी सारख्या लहान गावातला भागवत महाराष्ट्राचा लोकपत्रकार भागवत तावरे केला तो लोकाशाने . मला प्रसिद्धी सायत्ता दिली संपादक विजयराज बंब साहेबानी मला मुलासारखे जपले लेखणी बहाल केली. 1300 क्रॉस लाईन लिहून शेकडो विषय हातावर घेतले ज्यावर चर्चा झाल्या वाद झाले सवांद झाले मात्र संपादक साहेबानी मला रोखले नाही माझे अनेक वार त्यांनी झेलत मला सुरक्षित केले .याच काळात मला महाराष्ट्र पातळीवर 109 पुरस्कार भेटले , मी याच काळात शेकडो कार्यक्रमात वक्ता म्हणून उपस्थित राहिलो , याच लोकशाच्या पानातून विस्थापित पोरांना मांडू शकलो अन जिल्ह्यात एक सदर आणि साखळी उभा करू शकलो . मी जगात कुठे ही असो माझा जीव लोकाशात असायचा . माझ्या काम करण्याच्या टेबल वर विठलं रखुमाई व बुद्धाचा पिंपळ गाथा ज्ञानेश्वरी कुराण पुराण असायची मी माझी अधिकृत सुट्टी कधीच घेतली नाही . अनेक जण म्हणायचे सुट्टी दिवशी तरी ऑफिस का , माझं मन लागायच नाही माझ्यातला लेखक कधीच स्वस्थ बसायचा नाही . अवती भवती खटकले काही की विषय वाजलाच म्हणून समजा . क्रॉसलाईन हे सदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाचावी यावर व्यक्त व्हावं एकदा नाही अनेकदा . एक लेखक भागवत तावरे लोकांच्या कामाला पडू लागला मग त्याने लेखणीच्या जोरावर लोकांना आधार द्यायला सुरुवात केली , केरळ ला महापूर आला मी हाक दिली लोकांनी 35 लाख जमा केले केरळ ला पाठवले , सांगली कोल्हापूर मोहिमेत 10  टायर च्या दहा गाड्या भरून वस्तू सांगलीच्या भूमीवर आम्ही स्वतः जाऊन पोहोच केल्या ज्या बीड च्या मदतीचा पूर होता . कोरोनाच्या काळात जीव मुठीत असताना मी व माझे ज्येष्ठ व सहकारी संख्येने 300 रस्त्यावर उतरलो जिओ जिंदगी ला जन्म घातला तो याच लोकाशाने , हजारो जीव आज जिवंत आहेत ज्याची पुण्याई जिओ जिंदगीला ते देतात . लोकाशा मधून भागवत तावरे काही बोलले आणि लोकांनी ते उचलले नाही असे झाले नाही . 
 संपादक साहेब म्हणायचे लोकाशा माय आहे , होय अगदी आई सारखे लोकाशा ने मला मुलासारखे जपले आघात झाले तेव्हा पदरात घेतले . मात्र लेकरू कळत झालं की त्याला त्याचा संघर्ष वाटून दिला जातो तसा मी लोकाशा तून पाय उतार झालोय . बापाने यावं अन म्हणावे उद्या पासून तुझं तू शेत वहा आता तू स्वतंत्र शेतकरी आहेस जसे कसायचे तसे कस जे पेरायचे तसे पेर तुझी मेहनत तू कर तू कर आणि खा , सुपीक जमिनीतून एकदम बरड मिळावे , चिबडीच्या रानात औत टाकावे , पुन्हा तो माळ पुन्हा नांगरणी पुन्हा मोगडा पाळी पेरणी. नियतीने रासण्या घालणे सोडले नाही आणि मी पुन्हा पेरणे . शून्य माझा जिवलग मित्र तो मला कधीच सोडत नाही . तो पुन्हा 10 वर्षाने मला भेटलाय दोन चार दिवस झाले माझ्याकडे आहे उद्या परवा वाट लावतो आहे, मग पुन्हा एक दोन सुरवात . 
मागची अनेक वर्षे ज्या पायऱ्या चढताना आलेख वर जात होता काल त्याच पायऱ्या उतरताना मन भरून आले व्यवस्थापक अतुल सहकारी संपादक अभिजित मुकेश नितीन हे माझे भाऊच म्हणून होते असतील ऑपरेटर एजाज भाई विकी बाळासाहेब संदीप मला घडवणारे माणसे , प्रमोद वाघमारे आदिल तुम्ही भारी आहात , हजारे सरांच्या आठवणी असतील . 
मला पगार 22000 प्रत्येक महिन्याला माझ्या हातावर यायची 1700 वरचे 5000 हजार लोकाशा मधून कपात व्हायचे कारण जाहिरात दारांनी जी बाकी दिली नाही ती माझ्या पगारातून कापली जायची .  सतरा हजारात रूम भाडे गाडी पेट्रोल आणि मेस व्हायची . बँकिंग नावाची गोष्टच नाही कारण माझ्याकडे रुपया शिल्लक नाही टाकणार कुठे.  आज खिशात शून्य आहे मात्र डोक्यात नाही , डोक्यात हजारो संधी दारात उभ्या आहेत  देव अल्लाह एक दार बंद करतो तर दहा उघडतो असे म्हणतात . आज माझ्याकडे माझे मित्र सोडले तर काही नाही , नियतीने माझ्या कायम परीक्षा घेतल्यात कारण मी तिचा लाडका विद्यार्थी आहे नेहमी पास होतो . 
लोकाशा मधील माझा प्रवास असा थांबेल थांबवला जाईल असे मला चुकून कधी वाटले नाही , ज्या लोकाशाने महाराष्ट्र अंगावर आला तरी तिच्या लेकराला दूर केले नाही त्या आईने या लेकराला दूर करावे हे अनाकलनीय धक्कादायक होते . एका क्षणात गोठवले गेले मात्र 10 वर्षाचा अनुभव गोठवला जाऊ शकत नाही, ज्या कुठल्या शक्ती मला शून्य करण्यात काही कमावले या भासात असतील त्यांना एकच सांगणे की तूमच्या खिशातला संपत्तीला हा शून्य जड जाईल , माझे संपादक माझ्यासाठी दैवी आहेत मी त्यांना कधीही परका नसेल , त्यांचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा आम्ही दोघे ही रडलो , पहाडा सारखा माणूस गहिवरला ही माझी संपत्ती आहे, मी लोकाशात प्रचंड समर्पण दिले आहे मला लोकाशा तून काढले ते काही मी लांडी लबाडी केली म्हणून नाही मी अपहार केला म्हणून नाही तर मी प्रचंड लोकांत फिरतो अश्या समुदायाचे प्रश्न मांडतो ज्यांना एकटे पडायचे आहे अश्या लोकांसोबत मुक्काम करतो ज्यांना आम्ही शेतकरी म्हणतो हे कुणाला तरी कुठल्या शक्तीला तरी खटकले म्हणून त्यांनी लोकाशा च्या पायऱ्या चढल्या आणि मग मी उतरल्या . 
पन ऐका , हुनर छिना नही जा सकता 
लिहणारा भागवत लिहीत राहील जिथे जाईल तिथे समर्पण , मेरी जरूरते बहुत कम है , तू 'तेरी सल्तनत की फिकर कर , क्यो की फकीर को हराना सदी को हमेशा भारी पडा है . 
 मी हळवा भावनिक माळकरी आहे मी तो 30 रोजे धरणारा हिंदू भागवत आहे जो मुस्लिमांत भावा सारखा वागतो . महाराष्ट्र वाचणारा ऐकणारा समर्थक पाठक उभा करताना हा लोकपत्रकार  नव्या रुपात दालनात दिसेल तुमची कामे करताना तुमची भाषा बोलताना , लोक आरोप करतील मी उत्तर देणार नाही कारण नियती आहे त्या साठी 
पतझड आहे घाबरू नका 
बहारे फिर भी आयेगी 
लोकपत्रकार भागवत तावरे 
माजी वृत्त संपादक दैनिक लोकाशा बीड



सलाम त्या कर्तुत्वाला 🙏

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!