"""""""""""""""" """"""""""""""" " वसान " """""""""""

""""""""""""""""      """""""""""""""
       "   वसान "
        """""""""""
खुप झाल्या पाळ्या-ढाळ्या
बरचं काढलं कुळवाचं ' वसानं '
आयुष्यभर राबुन सुद्धा हाती काही नाही
वाट पहातय गावकुसाबाहेचं स्मशान ...

शेतकर्‍याची स्वप्न अशी 
कितीशी मोठी हाईत
अंगभर कपडा, जेवाला दोन घास
नि, दावनीला दोन बैल र्‍हावीत ....

घरात दोन चिल्ली-पिल्ली माझी
शिकतात  शाळेत रोज दोन बुकं
त्यांच्या साध्या अपेक्षा पुरवत नाही
निसते घेतोय कोरडे मुकं ........

कधी अवकाळी , कधी दुष्काळी
वारे वाहतील शेतात अती
राब-राब राबुन देहाची माझ्या
अजीर्ण झाली माती ............

रडून-रडून नंतर मग
वाचतील माझ्या जीवनाचा ' पाढा '
जीत्यापणी थोडे तुम्ही घ्या....
थोडे आमच्या  ताटात   ' वाढा ' ......!

  JD

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!