फेसबुकातले न्यायधीश आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला

फेसबुकातले न्यायधीश
 आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला





माझ्या गावात नागोबाचा ओटा म्हणजे उताराला लागलेल्या एस ट्यां उभा असलेले स्थानक , शेतातल्या कामावरून थकून भागून आलेली , लेकरांना कामा नौकरीला लावून निवांत झालेली बाप मंडळी बसून गप्पा मारायची , इट्स शिराळ गप्पा . अगदी बराक ओबामा यांनी हे बेस केले पासून ते शंकराचार्य यांचे माप देखील इथे काढले जाते , मग कुणी अवास्तव बोलले कि त्याला गावकरी टोमणा असायचा , काहीही कसा बोलतो नागुबाच्या वट्यावर बसला कि काय , अगदी असेच फेसबुक नावाच्या वट्यावर अनेक नागोबा दिवस रात्र फुत्कार . आई माई वर शिव्या देऊनच युक्तिवाद प्रतिवाद केला पाहिजे असा नवा रिवाज फेसबुक वर सराईत झाला आहे . शहाण्यांनी बोलयचच नाही का तर म्हणे येड्यांची दहशत आहे . आपल्याला वाटते तसेच सर्वांना वाटावे हि मागणीपर भावना माज या मापकाने मोजावी या पातळीवर शब्दबद्ध होते . आड रानात बसून अर्ध बुद्ध कुणालाही आडवे घेतो , नंगे को खुदा डरे कुठल्या नालायकाने म्हण काढली राम जाने , कारण नंगे को खुदा कसला डरतो , नंगे को अद्दल घडवतो . मात्र नको ते प्रघात पडले , खुदा डरतो म्हटल्यावर व्हा नंगे आणि भेड्वा कुणालाही असा रिवाज आला . मत मतांतरे असू शकतात मात्र यातून आई माईवर शिव्याच दिल्या पाहिजेत का , त्याच मत आहे तुला नाही पटत तर तो थोडीच तुला माझे मत पटूनच घे म्हणतोय , त्याला अ आवडते तुला ब आवडते , त्याने अ ची आरती केली तर तू ब ची पंचाआरती कर , मात्र तू अ ची आरती का केली म्हणणे कितपत सयुक्तिक आहे . कायद्याने सर्वांना सारखे अधिकार आहेत , दबाव झुंडीने केवळ प्रतिवाद दाबला जाऊ शकतो यातून आपला युक्तिवाद सबळ होतो असे नाही . काही लोकांना फेसबुक म्हणजे जग वाटते , ते तिथूनच फर्माने सोडतात , हा मूर्ख तो महामूर्ख आणि हे ठरवणारा तू कोण ... राजा हो गर्दी वसरली कि मग आपलेच प्रश्न आपल्याला प्रश्न विचारतात तेव्हा आपण आपल्या तोंडावर पडलेले असतो . आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म हे जग सुंदर करण्यासाठी दिलाय कि नाही , कसली घाण करतो यार , आणि तुला एखादी गोष्ट जशी वाटते तशी इतरांना वाटावेच असे थोडी आहे , त्याला त्याचे मत तुला तुझे , मी मूर्ख झालो म्हणून सगळे व्हा असे थोडीच असते . आपल्या बाप जाद्यानी हा समाज आणि समाजातला सलोखा हाताच्या फोडासारखा जपला आहे , आणि तू सिंगल पोष्ट ने त्या सलोख्याला जाळायला निघतो . रावणाचे टिकले नाही म्हणतो कि नाही , आमचे तर फेसबुक आहे नेट गेले कि तुझ गेट बंद होते . याला शहाणपण शिकव त्याला शहाणपण शिकव , तू कोण आहेस , पुसता येते का ...नाक . रामचरित मानस जगातले महाकाव्य आहे , महाकवी तुलसीदास यांनी लिहले , जसे आपल्याकडे वाल्मिकी रामायण तसे उत्तर भारतात रामचरित , ते तुलसीदास ते काव्य लिहल्यावर म्हटले मी काहीही केले नाही एक शब्द लिहण्याची देखील माझी पात्रता नाही , आणि आम्ही काय शेंगा हाणतो काय कॉमेंट हाणतो , तुला नाही पटले शांत रहा , बर एखादी गोष्ट पूर्ण समजून बोलावे तरी , एखाद्या लेखावर आपल्याला एखादी प्रतिक्रिया द्यावी हरकत नाही , तो लेख वाचावा मग त्यात आक्षेप काय मांडावा , मात्र असा घाईत व्यक्त होतो राजा कि जणू कॉमेंट टाकून कुठे पळून जायचे आहे . बापांची संख्या थेट १२ पर्यंत जाते , बर कुणाच्या बद्दल मत ठरवण्याचा आपल्याला काय अधिकार एकदा स्वतला विचारले पाहिजे . आपले शिक्षण समाजात आपण काय करतो किवा केले आहे , गावात आपल्याला किती जन ओळखतात आणि आपण फेसबुक वर थेट राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर ज्ञान हेपलतो . आभाळाला हेफले म्हणजे अर्थात यालाच म्हणत असावेत .
 दोस्त हो , फेसबुक चांगले माध्यम आहे यातून आपले विचार संघटन जगभर घेऊन जाण्याची संधी असते , यावर प्रेमाने माणसे कमवली जाऊ शकतात मात्र इथे द्वेषाने माणसे गमावली जात आहेत हे समजून घेतले पाहिजे . फेसबुकवरचे अकौंटं अभिसरणाचे निमित्त आहे ते कोर्ट नाही राजा हो . आपली जशी आई बाप तसेच त्याचे पण आहेत न , आपले सगळे हाडा मासाचे सारखेच ना , हे धर्म जात इथले आल्यावर रे , सर्वांचे रक्त सारखे हे नाना पाटेकर ने बोट फोडून दाखवले कि नाही , क्रांतीकारी होण्याच्या भानगडीत आम्ही क्रांतीकारी समजूनच घेतलाच नाही. आणि फेसबुक आभासी आहे तिथे फक्त दाह शमतो पोटातली भूक नाही . चार ओळीच्या कॉमेंटवर तुझा अर्धा दिवस जाणार असेल तर ते आमचे नाही तुझे नुकसान आहे. फेसबुक म्हणजे जग नाही , फेसबुक हे फक्त फेस बुक आहे , त्यामुळे या बुकाच्या बाहेर ये नाही तर काळ तुला बुक्का लावल्याशिवाय राहणार नाही , कुणीतरी आपल्या शिव्या खातो म्हणजे तो घाबरतो अस नाही , त्याच्या एकी तुला प्रतिवाद करणे एवढी लायकी देखील तुझी नाही असा अर्थ होतो .

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!