शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.



'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब व मान्यवर बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या समवेत गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले, तसेच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन व विधिवत पूजन केले. 

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 286.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी संपन्न झाले. त्याचबरोबर परळी एमआयडीसी, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र, बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कृषी भवन बीड, परळी शहर बस स्थानक यांसह विविध सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

कृषी उत्पन्न बाजार समिती परळी अंतर्गत सिरसाळा ता.परळी येथील कै.पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे यावेळी लोकार्पण संपन्न झाले. 

या कार्यक्रमात कृषी, सामाजिक न्याय, यांसह विविध विभागाच्या शासकीय योजनेतील 22 हजार लाभार्थींना एकूण सुमारे 749 कोटी रुपयांच्या लाभाचे थेट वितरण करण्यात आले. 

परळी वैद्यनाथ नगरीत येऊन बीड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांनी भरभरून निधी उपलब्ध करून देत विकासाचे नवे पर्व सुरू केले असून, याबद्दल त्यांचे बीड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानले.

सर्वांच्या सहकार्यातून बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून समृद्ध व विकसित जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी एकदिलाने काम करू, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. 
#शासन_आपल्या_दारी

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!