*अग्रीम पीक विम्याची* रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, Mid adversity survey (अंतरिम नुकसानीचे अहवाल) व त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण 1 हजार 700 कोटी 73 लाख एवढी *अग्रीम पीक विम्याची* रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अग्रीम 25% प्रमाणे या विम्याचे वितरण करण्यात येत आहे.
काही जिल्ह्यातील पीकविमा कंपन्या या अपिलात गेलेल्या आहेत. त्यांच्या अपिलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रक्कमेत आणखी मोठी वाढ होणार आहे.
राज्य सरकारने प्रथमच 1 रुपयात पिकविमा योजना राबवली, ती राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा एक रुपयात भरून यशस्वी करून दाखवली.
राज्यात खरीप हंगामात हवामानातील असमतोल, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ सदृश परिस्थिती अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीकविमा मिळणे व तो वेळेत मिळणे याबाबत मी सातत्याने आग्रही होतो.
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनीही वेळोवेळी बैठका घेऊन अग्रीम पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार हेही याबाबत सातत्याने आग्रही होते. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो.
त्यामुळे आज पहिल्या टप्प्यातील अग्रीम पीक विम्याच्या 1 हजार 700 कोटी रुपये रक्कमेच्या वितरणास सुरुवात होत असून, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याचबरोबर अपिलांचे निकाल व अन्य बाबी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित ठिकाणच्या विम्याचाही प्रश्न मार्गी लागेल व लाभार्थी संख्या आणि लाभाच्या रक्कमेत देखील मोठी वाढ होणे अपेक्षित आहे.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
Comments
Post a Comment
JD