चोरा हे बरोबर नाही रे बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र



चोरा हे बरोबर नाही रे 
बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र 

चोराबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे , परिस्थिती चोरी करायला भाग पाडते नाहीतर कधी नौकरदार गाड्या थोडीच चोरतो , मात्र विनंती चोरांना एवढीच की गरिबांच्या गाड्या चोरत नका जाऊ , माजलगाव तालुक्यातील एक पोरगा बापाला घेऊन सरकारी दवाखान्यात आला , ते तिकडे गोळ्या औषधात परेशान अन इकडे गाडी लंपास . चोरा कुठे राहतो गांधीनगर मध्ये का , रे रे गांधी नगर ला नको रे बदनाम करू . 
  गणेश मुळे राजेवाडी ता.माजलगाव जि‌.बीड येथून आपल्या वडीलावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन आला.जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्र.६ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.काही औषधे,जेवन, व तात्काळ सेवेसाठी येताना त्यांनी स्वतः ची मोटार सायकल पॕशन प्रो आणली.वडीलावर उपचार सुरू आहेत.त्या चिंतेत तो आहे.या दवाखान्यात त्याचे ओळखीचे कोणी नाही.त्यांनी आणलेली त्याची मोटार सायकल चोरांनी राञी चोरली.चोरी गेलेली मोटार सायकल आणि वडीलाचा आजार या दु: खात तो आहे.त्याला या उपचारांमध्ये मदत करणारी त्याची मोटार सायकल गरजेची आहे.हवे तो त्या चोराला वडील बरे झाल्यावर मोटार सायकल देण्यास तयार आहे.
हे चोरा कृपा कर त्याची मोटार सायकल जेथुन घेऊन गेलास तेथे परत कर तो मुलगा त्या दवाखान्यातील जागेवर येऊन फक्त रडत आहे. 
MH 44 H 5140

#बीडपोलिस प्लिज इतर गाड्याचे होत राहील एवढी गाडी आणून द्या राव प्लिज

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!