Posts

*कुणी लिहिलंय माहीत नाही,**पण आम्हीं अनुभवलंय;**हे वास्तव आहे....*

*कुणी लिहिलंय माहीत नाही,* *पण आम्हीं अनुभवलंय;* *हे वास्तव आहे....* *तीन चांगल्या गोष्टी* आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या. १) मॅगी यायच्या आत आम्ही *मोठे* झालो._ २) Mobile यायच्या आत आमचे *शिक्षण* झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ३) Whatsapp यायच्या आत आमचे *लग्न* झाले. आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं.  ABCD .......XYZ याचा संबंध *फक्त शाळेत* गेल्यावर, ते ही इंग्रजीच्या तासालाच ! आणि आता ABP माझा, CID, MRI, X-ray, Blood, Star TV, Z-TV *विचारूच नका.* आमच्या लहानपणी, *This is Gopal. आणि That is Seeta.* ही दोन वाक्ये पाचवीत गेल्यावर वाचता यायचे, तरी घरी *जबरदस्त कौतुक* व्हायचं ! आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची, की त्या पोराला *एकदम कंडक्टर* झाल्या सारखंच वाटायचं ! अहो कंडक्टर याच्यामुळे की ..... आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले,  हं sss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार ? असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं ..... *मी मोठेपणी कंडक्टर* होणार किंवा *पोलीस* होणार ! तुम्हाला खोटं वाटे...

जगायचंय, तर बदलायला शिका!"

Image
जगायचंय, तर बदलायला शिका!" गावाच्या मातीत वाढलेली पिढी राबराब राबते, पिकं पिकवते, पण त्यांचं मोल ठरवतं शहरातल्या एसी रूममध्ये बसलेलं कोणी तरी. शेतकऱ्यांनो, हे लक्षात ठेवा—पुढच्या पिढीला टिकवायचं असेल, तर शिक्षणाची वाट धरायलाच हवी. हो, सुरुवातीला तुमची मुलं अडचणींना सामोरं जातील. शहरात चाकरीच्या शोधात काट्यांवर चालावं लागेल. पण हे काही काळाचं दुःख, अशिक्षित राहून आयुष्यभर संधी गमावण्यापेक्षा या संघर्षाला सामोरं जाणं केव्हाही चांगलं. शहरं आता बोलूनसुद्धा गंडवायला शिकली आहेत. आणि आपण अजूनही प्रामाणिकपणाच्या धाग्यात गुंतलेलो. आजचा जमाना असा झालाय की फसवणूक करणाऱ्यांना शहाणं मानलं जातं. तुम्ही प्रामाणिकपणे दूध विकता, पण शहरात तेच दूध बाटलीत भरून शंभर रुपयांनी विकलं जातं. ज्यांचे करोडोंचे धंदे चालतात, ते कर भरत नाहीत. पण "शेतकरी टॅक्स भरत नाही" म्हणून उगाच गळा फाडतात. ज्यांना आपल्या बाल्कनीत झाडं जगवता येत नाहीत, ते ऊस न लावण्याचे सल्ले देतात. त्यांना काय कळणार? ज्यांच्या गॅलरीत कबुतरं हागतात, ते सांगतात "गाय पाला!" आणि त्याच गायी रस्त्यावर दिसल्या की हाक...

स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Image
❤️ स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी .. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिचा वनडे क्रिकेटमधील जबरदस्त प्रवास सुरूच आहे. कोलंबो येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. 101 चेंडूंमध्ये 116 धावा करत स्मृतीने भारतीय संघाला 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावांपर्यंत नेले. ही धावसंख्या श्रीलंकेसाठी एक आव्हानात्मक लक्ष्य ठरली. ❤️ शतकासह मोठा विक्रम या शतकासह स्मृतीने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. ती आता ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (15 शतके) आणि न्यूझीलंडच्या सूजी बेट्स (13 शतके) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडच्या टैमी ब्यूमोंटला मागे टाकले असून, ब्यूमोंटच्या नावावर 10 शतके आहेत. ❤️ स्मृतीची जबरदस्त खेळी स्मृती मांधनाने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावांची खेळी केली. तिचा स्ट्राइक रेट 114.85 इतका होता. डावाची सुरुवात करताना तिने प्रतिका रावलसोबत 70 धावांची भागीदारी केली. प्रति...

भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता ?

Image
भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता ? सायरन वाजवण्याचेही सर्व राज्यांना निर्देश. संपूर्ण भारत देश हाय अलर्ट वर गृहमंत्र्यालयाचे आदेश . 🚨 🪖 - शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देण्याचेही आदेश.  - - निर्वासन योजनेचे अद्यतन आणि त्याची तालीम एखाद्या हवाई हल्ल्यात कोठे अडकले असल्यास तेथून सुखरूप बाहेर पडण्याचे तालीम घेण्याचे ही आदेश.  pointnewsmarathi.blogspot.com

बोंबला ! बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये निघाली तीन सडलेली कुत्रे ?

Image
बोंबला ! बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये निघाली तीन सडलेली कुत्रे ? हे सत्य की अफवा ? बीड नगर परिषद प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा : मागणी फिल्टर पॉईंट ते माजलगाव 40 किलोमीटर अंतर पाईपलाईनमध्ये आणखी काय काय आहे देव जाणो? बीड शहरातील अनेकांच्या घरात पाईपलाईनमधील सडलेल्या अशुद्ध लाखो लिटर पाण्याचा स्टॉक असल्याची माहिती कुत्र्यांमुळे दूषित झालेले पाणी सोडून दिल्याने उमरीच्या नदीला पूर ?

Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका.

Image
Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका IPL 2025 Points Table MI vs LSG : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत मागील पराभवाचा हिशोब क्लिअर केला. तसेच मुंबईच्या या विजयामुळे पॉइंट्स टेबलमधील चित्र पूर्णपणे बदललं.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने 18 व्या मोसमात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबईने रविवारी 27 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत सलग पाचवा तर एकूण सहावा विजय मिळवला. मुंबईने 216 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौला 161 वर ऑलआऊट केलं. मुंबईने अशाप्रकारे 54 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. मुंबईला या विजयानंतर तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतल्याने टॉप 5 मधील संपूर्ण चित्रच बदललं आहे. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची मॅरेथॉन झेप घेतली आहे. मुंबई लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी पाचव्या स्थानी होती. मात्र विजयानंतर मुंबईने थेट दुसर्‍या क्रमांकावर उडी घेतली. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली...

तुम्ही या परिस्थितीत काश्मिरला आमच्या जागी असतात तर ?

Image
ट्रोलर्सच्या कर्तुत्वाला सलाम! तुमच्या जागी आम्ही असतो तर हेच केले असते.  पण तुम्ही या परिस्थितीत काश्मिरला आमच्या जागी असतात तर ?   काश्मीर पहलगाम इथे दहशतवादी हल्याची घटना घडल्यानंतर 3 दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इथं मदत करण्यात व्यस्त होतो. त्यावेळी महाराष्ट्रात एक विडिओ वायरल होऊन काही जण खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया देत आहेत असे जवळचे काही जण फोन करून सांगत होते पण अपुरी यंत्रणा आणि इथल्या आपल्या लोकांना मदत करणे हे अधिक महत्वाचे असल्याने त्यावर मला तात्काळ बोलता आले नाही.  पण इथली खरी परिस्थिती आपण समजून घ्यायला हवी. त्या विडिओ मध्ये मी घेतलेली भूमिका ही कोणत्या परिस्थितीत घेतली हे ही आपण समजून घ्यायला हवं.  22 एप्रिल 2025 रोजी पेहलगाम येथे हल्ला झाला त्यादिवशीच आम्ही सकाळी 9.30 वाजता श्रीनगर एअरपोर्टला पोहचलो होतो. फ्रेश होऊन आम्ही 11.30 ला बाहेर पडलो टुलिप गार्डन व इतर गार्डन बघत असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आम्हाला आमच्या वाहन चालकाकडून मिळाली. त्यावेळी त्यात 2 जण शाहिद झाले आहेत अशी तात्पुरती प्राथमिक माहि...