Posts

कोकण रेल्वेच्या जन्माची कथा :

Image
कोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल…! सुट्टीमध्ये किंवा सणवारी जर कोकणातल्या मामाच्या घरी जायचं असेल तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बाय रोड जायचं म्हटलं तर रस्ता कठीण आणि वेळ सुद्धा खूप लागायचा. अशा वेळी कोकणातल्या सर्वांना आणि कोकणात जाणाऱ्यांनाही असे वाटायचे की, सगळीकडे मेली रेल्वे आली. आपल्या कोकणाक कधी यायची ही आगगाडी? १९९३ सालापर्यंत मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा व कर्नाटक, केरळच्या तसेच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी डायरेक्ट रेल्वेची सोय नव्हती. अखेर आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी १९९८ साली कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली. कोकण रेल्वे सुरु व्हायच्या आधी २ मोठी बंदरं असलेली शहरे म्हणजेच मुंबई आणि मंगलोर एकमेकांशी डायरेक्ट रेल्वेने जोडलेली नव्हती. लोकांना त्या भागात जायचे असेल तर पुणे-बेळगाव-बंगळूरू अशा रूटच्या ट्रेनने जावे लागायचे. मंगलोर हून मुंबईला यायचे असल्यास लोकांना आधी कादूर किंवा बिरूरला बसने जावे लागायचे आणि मग तिथून मुंबईसाठी ट्रेन पकडावी ल...

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना

Image
बीड दि. १९ पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता. घोडका राजुरी येथील तरुण पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस करत होते. याच वेळी बीडहून परभणी कडे भरधाव वेगाने जाणारी बीड परभणी गाडीने या मुलांना जोराची धडक दिली. या घटनेत तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे वय २० वर्ष, विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष तसेच ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष यांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.

"नानाची वाडी"...नाना पाटेकर यांचं शेतघर पाहिलं का

Image
"नानाची वाडी"...नाना पाटेकर यांचं शेतघर पाहिलं का ...नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी सृष्टीतही स्वतःची ओळख बनवली आहे. मुंबईची गर्दी आणि उंच उंच इमारती पाहून त्यांची घुसमट व्हायची. त्याचमुळे गेल्या १५ वर्षांपासून ते पुण्यातील त्यांच्या कुटुंबासह शेतघरात राहायला गेले आहेत. 'नानाची वाडी' या नावाने त्यांचं पुण्यातील खडकवासला येथील डोणजे या गावात शेतघर आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या ७ ते ८ एकर क्षेत्रावर त्यांनी ही शेती केली आहे. इथे तांदूळ, हळद अशी पिकं ते घेतात.भली मोठी विहीर, घराच्या परिसरात असलेले सिमेंटचे रस्ते, दगडी बांधकाम असलेलं भलं मोठं शेतघर, घराभोवती फळा फुलांची झाडं, जनावरांसाठी गोठा अशी रचना त्यांनी करून घेतली आहे. त्यांच्या या शेतघराची अनेक सेलिब्रिटींना भुरळ पडली आहे तर राजकीय नेत्यांनीही इथे हजेरी लावलेली पाहायला मिळाली. त्यांची खासियत म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, मित्राला जेवू घातल्याशिवाय नाना त्यांना जाऊ देत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या 'गिरीजा' गाईला वासरु झालं तिचं नाव त्यांनी 'जनी' ठेवलं. त्यामुळे त...

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

Image
▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा ▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला. ▪️मा.नितीनजी गडकरी साहेबांचे मनःपूर्वक आभार. ▪️सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगतच्या स्लीप रोडसह महालक्ष्मी चौकात उड्डाणपुल बांधण्यासंदर्भातील तांत्रिक शक्यता तपासण्याचे निर्देश केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दि.२७ जून २०२४ रोजी दिले होते. ही कार्यवाही पूर्ण करून बहुप्रतिक्षित असलेल्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांसह सर्व्हिस रोडच्या निविदा विभागाने काढल्या आहेत. या कामाबद्दल लोकसभा निवडणुकीत माजलगावच्या जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी बीडकारांना दिलेला शब्द पाळत वर्षभराच्या आता कामांच्या निविदा काढल्या आहेत. याबद्दल ना.नितीनजी गडकरी साहेबांसह शिफारस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानले आहेत. भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. यात महालक्ष्मी चौकातील उड्डाणपुलासोबतच तेलगाव आणि पिंपळनेर रस्त्यावरील स्लिप रोडची देखील मागणी करण्यात आली होती. या पत्रांचा संदर्भ देत ना.नितीनजी गडकरी यांच्या आदेशावरून...

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!

Image
चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!! ● अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना, चौघांवर गुन्हा अंबाजोगाई - बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता वरचेवर चिंताजनक बनू लागला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक अजिबात राहिला नसल्याचे दर्शविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.  जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख (रा. सदर बाजार, अंबाजोगाई) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. जमीरचा भाऊ शेख मतीनच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.२५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. यावेळी जमीरने त्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री १२.३० वाजता जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले. जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली ...

शेतकरी बांधवांच्या मदतीपोटी 543 कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Image
बीड जिल्ह्यात ऑगस्ट व विशेषत: सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे ऐन सुगीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाशी समन्वय साधून नुकसानग्रस्त शे तकरी बांधवांच्या मदतीपोटी 543 कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 15 हजार शेतकऱ्यांना होणार आहे...  #Beed #DMUpdates

डी. गुकेश याने विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे.

Image
सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश याने विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. डी. गुकेश हा जगातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता होण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे रचला असून, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. विश्वविजेता डी. गुकेश याचे मनःपूर्वक अभिनंदन! #Chess #GukeshDing #Gukesh #ChessChampionship