Posts

"""""" शेती मातीच्या कविता """""""

Image
"""""" शेती मातीच्या कविता """""""          " मुक्त विद्यापीठ " ००००००००००००००००००० नाही वाचली पोथी- गाथा वाचली फक्त 'माती ' कष्टाच्या विद्यापीठात भेटली ज्वारी- बाजरीच्या कणसातील ' मोती '....१ कष्टाचे गिरवले सदा काळ्या मातीत पाठ मुठ धरुन नांगराची कधी सोडवली यठनाची गाठ .......२ दमलेले बैल विसावताना नाही मोजली कधी ' काकरी ' सर्जा- राजाचे मोल कसे विसरु सांगा? वर्षाची भाजते तव्यावर ' भाकरी '..३ थुई- थुई पावसातही भरले जसे अथांग ' सागर ' कुनब्यांचे भरले पेव , तवा देशाचे गहिवरले ' कोठार ' .....४ रानावनात तेंव्हा ....... पक्षांनी बांधली 'घरटी ' शोधुन सापडत नव्हती तेंव्हा चोरी करत नव्हती भूरटी .......५ अशी सधन तेंव्हा  निपजत होती पीढी बापा समोर कोणी ओढत नव्हता वीडी .....६             ✍️

पोस्ट ऑफिस भरत आहे भरमसाठ व्याजाची रक्कम!

Image
Post office RD yojana online apply : पोस्ट ऑफिसभरत आहे भरमसाठ व्याजाची रक्कम! होय ! नुकतेच पोस्ट ऑफिसने आरडी योजनेच्या व्याजदरात वाढ केली. आता दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्हाला लाखो रुपयांचे रिटर्न मिळू शकतात. पोस्ट ऑफिस आरडी योजना काय आहे पोस्ट ऑफिस आरडी ही एक लहान बचत योजना आहे. आरडीचे पूर्ण रूप ‘रिकरिंग डिपॉझिट’ आहे. आवर्ती ठेव ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे जी मासिक हप्त्यांमध्ये जमा केली जाते. त्याचा एक निश्चित कालावधी असतो. जमा केलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिसद्वारे व्याज दिले जाते. आरडी योजनेसाठी मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. 5 वर्षांनंतर, तुम्ही मॅच्युअर क्लोजर करून तुमचे पैसे व्याजासह मिळवू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण ते पुढील 5 वर्षांसाठी वाढवू शकता. आरडी योजनेंतर्गत, जर तुम्हाला 5 वर्षापूर्वी रक्कम मिळवायची असेल, तर पोस्ट ऑफिस 3 वर्षांनंतर मुदतपूर्व बंद करण्याची सुविधा देखील प्रदान करते. निर्धारित कालावधीपूर्वी ठेवीतून पैसे काढण्याच्या प्रक्रियेला ‘प्रीमॅच्युअर क्लोजर’ म्हणतात. यासाठी तुमच्याकडे ठोस कारण असले पाहिजे. विवाह, शिक्षण, आरोग्य आणि व्यवसायाशी संबंधित...

#मराठ्यावर भ्याड_हल्याचा ⚫️ जाहीर निषेध ⚫️

Image
#मराठ्यावर भ्याड_हल्याचा ⚫️ जाहीर निषेध ⚫️ #मनोज_जरांगे_पाटील यांचे सहकारी तसेच #कोपर्डी घटनेतील #बलात्कारी #नराधमांना चोप देणारे #अमोल_खुने यांच्यावर आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन ते चार लोक्कानी दगडफेक करत भ्याड हल्ला केला. यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर #अज्ञात_आरोपी पसार झाले. दरम्यान भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो #मराठा_समाज_बांधवांनी रुग्णालयात धाव घेतली होती, यावेळी भ्याड हल्ल्याचा #निषेध व्यक्त करत आरोपींना #अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

" पोळी "

Image
"""""""""""" """"""""""""""""     " पोळी "      """"""""" निर्ढावलेल्या बोक्याला जेवण वाढा थोडं गढूळ पाणी देऊन थोडी मोडा त्याची खोडं ..... तेल नाही भाजीला गोंडराची पचव भाकर मलिदा तर खुप खाल्ला आता थोडा बन ' चाकर ' .... अरे, शेतामधल्या मालाची किंमत करता तुम्ही खालपासुन वरपर्यंत शेतमालाचे खातात ' दलाल ' लोणी ..... बाजार नाही म्हणुन कधी माल फेकावा लागतो रस्त्यावर शेतकर्‍याचे जीवन कठीण घेतात लोक सस्त्यावर ...... राब-राब राबुन त्याच्या  जीवनाची होते ' होळी ' येथून-तेथून सारे एकच भाजतात त्याच्या पोटावर ' पोळी '       ✍️ Jivan Dhapse              7279828384 🔥🔥🎋🎋🍁🍁🌾🌾📗

"""""""""""""""" """"""""""""""" " वसान " """""""""""

Image
""""""""""""""""      """""""""""""""        "   वसान "         """"""""""" खुप झाल्या पाळ्या-ढाळ्या बरचं काढलं कुळवाचं ' वसानं ' आयुष्यभर राबुन सुद्धा हाती काही नाही वाट पहातय गावकुसाबाहेचं स्मशान ... शेतकर्‍याची स्वप्न अशी  कितीशी मोठी हाईत अंगभर कपडा, जेवाला दोन घास नि, दावनीला दोन बैल र्‍हावीत .... घरात दोन चिल्ली-पिल्ली माझी शिकतात  शाळेत रोज दोन बुकं त्यांच्या साध्या अपेक्षा पुरवत नाही निसते घेतोय कोरडे मुकं ........ कधी अवकाळी , कधी दुष्काळी वारे वाहतील शेतात अती राब-राब राबुन देहाची माझ्या अजीर्ण झाली माती ............ रडून-रडून नंतर मग वाचतील माझ्या जीवनाचा ' पाढा ' जीत्यापणी थोडे तुम्ही घ्या.... थोडे आमच्या  ताटात   ' वाढा ' ......!   JD

" फाटकी झोळी "

Image
"""""""""""""""" """""""""""""""""     " फाटकी झोळी "       """""""""""""""""" जुण्याच वाटा, जुण्याच सवयी जुणेच माझे 'ओझे ' बाजाराच्या वेशिवरती 'काळीज ' जळते माझे .....! थेंब-थेंब पाणी देऊन दुष्काळात वाढवला ' मळा ' थोराड बाग वाचवण्या संञांची भुंडा केला पत्निचा गळा .....! वाटलं होतं औंदा तरी भरेल माझी फाटकी झोळी अवकाळीनं कंबरडं मोडलं  स्वप्नात राहीली ' पोळी ' .......! कापसाचा झाला चोथा सोयाबिनला आले ' कोंब ' जुनेच मढे बांधावरती कोठे मारावी आम्ही बोंब .....! आत्ता माञ गारा खाऊनच भरायचे काय ? आमचे पोट दगड फूलालाही जगणे आहे हिरवा ठेवा त्याचाही देठ ......!           ✍️ JD               

मांडवसआली आली मांडवस डोई काहुर दाटलेकसा मिळे सालकरीमन प्रश्नांत बुडले

मांडवस आली आली मांडवस  डोई काहुर दाटले कसा मिळे सालकरी मन प्रश्नांत बुडले         ‌‌लाखा लाखांच्या घरात         साल यंदाही चढले         तरी बोली वर बोली         बोल वाढीव बोलले          धरे आज तरूणाई वाट मोठया शहराची लाज वाटते गावात कामं करण्या शेताची    ‌‌ माह्या शिवारी गोठ्यात        बैल एकटे झुरते       निज येईना निवांत        भय चोरांचे वाटते दिसे वावर डोळयात चिंता मनात जाळते गड्या विना गाडा सुना फक्त मालक जाणते           ठेवा पिढ्यान् पिढ्याचा           त्याच्या पुढ्यात घुमते           लावे छातीले हो माती           गडी सालान बांधते गर्द हिरव्या पानाच मग तोरण करते चैत्र पालवी कोवळी मनीं आस फुलवते         गुढी उभारून दारी          खाऊ मांडवात देते     ...