Posts

'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा.

Image
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.  मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.  पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील...

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा.

Image
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा , यासाठी व्यापक प्रयत्न केले जावेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आज किसान संघासह कृषी विभागाच्या आयोजित बैठकीत केल्या. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्याबाबत व्यापक जनजागृती हाती घेतली आहे. सोयाबीन, कापूस, नारळ आदी पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

8 वा आशिया इकॉनॉमिक डायलॉग 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पुण्यात होणार आहे.

Image
8 वा आशिया इकॉनॉमिक डायलॉग 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पुण्यात होणार आहे ‘जिओ-इकॉनॉमिक चॅलेंजेस इन एरा ऑफ फ्लक्स’ या थीमवर केंद्रित, AED 2024 मध्ये 11 देशांतील 46 वक्ते असतील जे तीन दिवसांत 12 सत्रांमध्ये सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (PIC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2024, वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषद, 29 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत शहरात होणार आहे. ‘जियो-इकॉनॉमिक चॅलेंजेस इन एरा ऑफ फ्लक्स’ या थीमवर केंद्रित, AED 2024 मध्ये 11 देशांतील 46 वक्ते असतील जे तीन दिवसांच्या 12 सत्रांमध्ये सहभागी होतील. ‘दक्षिण आशियातील आर्थिक एकात्मतेला चालना देणे’ या विषयावरील उद्घाटन सत्राचे अध्यक्ष अंब हे असतील. गौतम बंबावाले, संयोजक, AED 2024, पाकिस्तानमधील माजी भारतीय उच्चायुक्त आणि चीन आणि भूतानमधील माजी राजदूत. पॅनेलमध्ये अंब विनय मोहन क्वात्रा, परराष्ट्र सचिव, भारत सरकार यांचा समावेश आहे; अंब सेवा लमसाल, परराष्ट्र सचिव, नेपाळ आणि अंब मसूद बिन मोमेन, परराष्ट्र सचिव, बांगलादेश. या सत्राचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ॲनिकेन ...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी - ईलियास पटेल यांची निवड..!

आज नुकत्याच जाहीर झालेल्या निवडी मध्ये अल्पसंख्याक समाजातील युवक तथा पिंपळगाव कानडा ग्रामपंचायत चे उपसरपंच ईलियास पटेल यांची विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून मला उपाध्यक्षपदी काम करण्याच्या दिलेल्या संधीचा मी विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उपयोग करणार आहे. अनेक विद्यार्थी तालुक्यातील वेग वेगळ्या महाविद्यालयांमध्ये तसेच बीड शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येत असतात. त्यांचे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्याथ्यांचा हक्काचा आवाज होण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब, माझे नेते मा.श्री. अमरसिंहजी पंडित साहेब, युवकांचे हृदयस्थान मा.श्री. विजयराजे पंडित साहेब, विद्यार्थी काँगेस चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. प्रशांत दादा कदम, युवा नेते मा....