Posts

आपल्या परिचयातील कोणी MBBS किंवा

Image
आपल्या परिचयातील कोणी MBBS किंवा BAMS असेल तर वरील फॉर्म नक्की भरावा . CLASS 1 पदाची भरती आहे . 3 वर्षातली सर्वात जास्त जागा आहेत . याचे लास्ट प्रमोशन वैद्यकीय सचिव पर्यत जाते .

फेसबुकातले न्यायधीश आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला

Image
फेसबुकातले न्यायधीश  आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला माझ्या गावात नागोबाचा ओटा म्हणजे उताराला लागलेल्या एस ट्यां उभा असलेले स्थानक , शेतातल्या कामावरून थकून भागून आलेली , लेकरांना कामा नौकरीला लावून निवांत झालेली बाप मंडळी बसून गप्पा मारायची , इट्स शिराळ गप्पा . अगदी बराक ओबामा यांनी हे बेस केले पासून ते शंकराचार्य यांचे माप देखील इथे काढले जाते , मग कुणी अवास्तव बोलले कि त्याला गावकरी टोमणा असायचा , काहीही कसा बोलतो नागुबाच्या वट्यावर बसला कि काय , अगदी असेच फेसबुक नावाच्या वट्यावर अनेक नागोबा दिवस रात्र फुत्कार . आई माई वर शिव्या देऊनच युक्तिवाद प्रतिवाद केला पाहिजे असा नवा रिवाज फेसबुक वर सराईत झाला आहे . शहाण्यांनी बोलयचच नाही का तर म्हणे येड्यांची दहशत आहे . आपल्याला वाटते तसेच सर्वांना वाटावे हि मागणीपर भावना माज या मापकाने मोजावी या पातळीवर शब्दबद्ध होते . आड रानात बसून अर्ध बुद्ध कुणालाही आडवे घेतो , नंगे को खुदा डरे कुठल्या नालायकाने म्हण काढली राम जाने , कारण नंगे को खुदा कसला डरतो , नंगे को अद्दल घडवतो . मात्र नको ते प्रघात पडले , खुदा डरतो म्हटल्याव...

"" "" " हृदयस्पर्शी कविता """" " घर " """""""""""

Image
"" "" " हृदयस्पर्शी कविता """"       " घर "      """"""""""" या र या र बाळांनो ,              नका होऊ पाठमोरी या अखेरच्या क्षणांना नको ?              जीव घोरी ..........! गेली नजर माझी ,              कशा ओळखाव्या पोरी त्यांचा आवाज माझ्या                बसलाय उरी ......! आता आठवणींचा उरला              फक्त गडद रंग कशी करु तेल- फणी            कसा पाडु त्यांचा भांग...! धावत आली सासरवासिन            तिला कसे घालु जेऊ-खाऊ सांधी-कोपर्‍यातला रवा           आता कसा दाऊ ....! आई होताना करावं लागतं            फार मोठं दिव्य पार तुमच्या काळजात असतं ' बाळांनो '          माझं इवलसं ' घर ' ....!             ✍️ जिव...

होय साहेब ,तेवढी विहीर लावून द्या की सात बाऱ्याला , हो,"

Image
होय साहेब ,तेवढी विहीर लावून द्या की सात बाऱ्याला , हो," का नाही लगेच' म्हणून चहाच कप संपवून तलाठी साहेबानी किक मारली आणि ,या तहसीलात म्हणून गेला चहाचे पैसे शेतकऱ्यांनी दिले आणि गडबडीत पायी तो तहसील कडे गेला जाऊन तालाठ्याला दिसेल अश्या जागी जाऊन बसला ,पंधरा मिनिटात तो कसाबसा चेहरा करून त्याच्यावर खेकसून लगेच आले काय इकडं , हो तुमीच म्हणले होते म्हणून आलो साहेब ,बरं असं नसतंय होत त्याला तुमचा कागदपत्रे लागतात आणि उद्या या आज मीटिंग आहे उद्या भेटू, तेव्हा शेतकरी उठला आणि काम अरद्याच्या वर झालय असा आनंद तोंडावर घेऊन तो गावाकडं निघाला . जाताना जिलेबीच दुकानाकडे पाहिलं पण कापूस वेचणाऱ्या लेकराला न्हयायची त्याची हिम्मत नाही झाली .बांधलेली बैलं दीनवणी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती , कुठं गेला होता सकाळीच तहान लागली म्हणून..तेवढ्यात म्हशी फिरत होत्या , अंगातल शर्ट काढलं आणि बैलांना पाणी दाखवून सावलीला बांधलं ,म्हशीला करकर चारा कापून आणून घातला तसा त्यांनी मोठा पुण्याचा सुस्कारा सोडला , तसा खिशातली तंबाखू काडून खाली ,न्हयारीची भाकर दुपारी दोन वाजता खाल्ली .उद्या अजून...

नाथा पुरे आतामराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावाक्रॉसलाईन दैनिक लोकाशा

Image
नाथा पुरे आता मराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावा क्रॉसलाईन  दैनिक लोकाशा एकनाथ शिंदे शेवटच्या भाषणात कामाचे बोलतील असा कयास अर्थात अंधश्रद्धा मिडिया सह समाजाला होती , जरांगे गेली अनेक महिने सरसकट प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत आहेत , मात्र ४४ मिनिटांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सरसकट कुठलाही शब्द वापरलेला नाही , न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल प्राप्त आणि कायदेशीर बाबी तपासून लवकर स्वीकारेल अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली , आणखी एक फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेऊ असे एक ते म्हटले . हो न , त्यांनी परवाच्या भाषणात कुणबीचा कुठलाही आकडा सांगितला नाही , यातून ओबीसी मध्ये किती मराठे जाणार हे नक्की नाही . कारण या शिवाय कुणाचीही भीती किवा आक्रमण निश्चित होणार नाही . ५४ लाख नोंदींचा आकडा आत्ताचा नाही तर एकुन चा आहे , या तीन महिन्यात २८ ते २९ हजार नोंदी मिळाल्या आहेत , हे बहुतेकांना माहित नाही . अनेकांनी असे समजून घेतले कि शिंदे यांनी शब्द पाळला आहे मात्र इतर जातींना वंशावळ दाखवली कि काष्ठ निघते , तर त्या नियमाने नोंदी सापडलेल्या वंशात देखील कुणबी द्याव असे म्हणणे समोर आले आह...

ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख

Image
ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख ही पीढ़ी आता 35 ओलाडून 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली..... १,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*. ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित.... *टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.  *मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.  कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही ...

Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त.

Image
Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त. .. इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची पंचावन्न वर्षाची जुनी इमारत आज पाडायला सुरूवात झाली़. नाविन्याची उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे, मात्र जुन्याच्या बाबतीतील आठवणी विसरता येणे शक्य नाही. जेव्हा बस स्थानकाची एक एक भिंत व विट पडत होती़ तेव्हा बीड करांच्या बस स्थानका बाबतच्या जुन्या आठवणी बस स्थानकाच्या वास्तुभोवती रूझी घालत होत्या.  जी वास्तू प्रवाशांच्या सुख दुखा ची पन्नास वर्ष साक्षीदार राहिलेली आहे. ती वास्तू डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. बस स्थानकाची जुनी इमारत पाडताना पाहून प्रत्येक जण जुन्या इमारतीच्या आठवणींना उजाळा देत होता.... आजवर 53 वर्ष बीड बसस्थानकाची इमारत बीडकरांच्या सेवेत उभी होती.... आता नवीन बस स्थानकाची इमारत उभी राहते आहे...