Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त.
Beed : बसस्थानक ईमारत जमीनदोस्त. .. इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची पंचावन्न वर्षाची जुनी इमारत आज पाडायला सुरूवात झाली़. नाविन्याची उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे, मात्र जुन्याच्या बाबतीतील आठवणी विसरता येणे शक्य नाही. जेव्हा बस स्थानकाची एक एक भिंत व विट पडत होती़ तेव्हा बीड करांच्या बस स्थानका बाबतच्या जुन्या आठवणी बस स्थानकाच्या वास्तुभोवती रूझी घालत होत्या. जी वास्तू प्रवाशांच्या सुख दुखा ची पन्नास वर्ष साक्षीदार राहिलेली आहे. ती वास्तू डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. बस स्थानकाची जुनी इमारत पाडताना पाहून प्रत्येक जण जुन्या इमारतीच्या आठवणींना उजाळा देत होता.... आजवर 53 वर्ष बीड बसस्थानकाची इमारत बीडकरांच्या सेवेत उभी होती.... आता नवीन बस स्थानकाची इमारत उभी राहते आहे...