हरिनामाच्या गजराने गेवराई नगरी दुमदुमली .
हरिनामाच्या गजराने गेवराई नगरी दुमदुमली . ================= शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त उन गेवराईत भव्य शोभायात्रा =============== *देखावे आणि वारकऱ्यांच्या दिंडीने गेवराई शहर झाले भक्तीमय* ================ गेवराई दि.४ (प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने गेवराई शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा आणि कीर्तन सोहळ्याचा प्रारंभ आज सकाळी भव्य दिव्य शोभायात्रेने झाला. भक्तीमय संदेश देणारे देखावे, दिंडी, हत्ती, घोडा आणि हरिनामाचा गजर करत वीस शाळेतील वारकरी या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेतील सजवलेल्या रथातून भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांची मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजराने शहर दुमदुमले दरम्यान या शोभायात्रेमुळे शहर भक्तीमय झाले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते रणवीर पंडित यांच्तयासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेवराई तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे...