Posts

पंकजा_गोपीनाथ_मुंडे

Image
l पंकजा_गोपीनाथ_मुंडे  माझे कार्यकर्ता स्व. आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथे आज पोपट वायभासे यांच्या कुटुंबियांची शोकसभा झाली. पोपटराव हा एक सक्रिय कार्यकर्ता आहे जो प्रत्येक कामात स्वतःला झोकून देतो...खरेतर एक सेनानी, पण असा टोकाचा निर्णय घेणे आणि आपल्या कुटुंबाचा त्याग करणे हे मला कमजोर करणार आहे. पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कधीच कमी न होणारा आहे, त्यांच्या दु:खाचे ओझे वाटून घेण्याचा मी प्रयत्न करत राहीन. त्यांच्या निरागस मुलांची आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी मी घेत आहे. पण ही जबाबदारी माझ्यासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अस्थिर भाव मला अस्वस्थ करतात. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो "एका पराभवाने खचून जाण्याएवढे आपण दुबळे नक्कीच नाही, पण हे दुःख माझ्यासाठी असह्य आहे. आपला जीव सोडू नका. जर तुम्हाला धैर्याने लढणारा नेता हवा असेल तर मलाही लढणारा कार्यकर्ता हवा आहे. मी माझ्या लोकांना गमावू इच्छित नाही घटना मला धक्का देतात. मी आज खूप अस्वस्थ आहे. पंकजा_गोपीनाथ_मुंडे

एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या समवेत उपस्थित राहून सर्व प्रतिनिधींशी व उपस्थितांशी संवाद साधला.

Image
आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या घटक राज्यांची परिषद संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या समवेत उपस्थित राहून सर्व प्रतिनिधींशी व उपस्थितांशी संवाद साधला.  विविध राज्ये पिकांची किमान आधारभूत किंमत किती असावी, याच्या शिफारशी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाकडे करतात. मात्र त्यात तफावती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे त्यात सुसूत्रता व एकवाक्यता आणणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेत असून, त्यादृष्टीने आज आयोजित करण्यात आलेली परिषद अत्यंत महत्वाची आहे.  सर्व राज्यांनी मिळून समन्वयातून विविध पिकांच्या आधारभूत किमतींच्या शिफारशी एकत्रित व समसमान तसेच शेतकऱ्यांचा लाभ विचारात घेऊन केल्याने सर्व संबंधित राज्यांना फायदा होईल, असे आवाहन यावेळी केले.  ही परिषद ऐतिहासिक ठरणार असून, रब्बी ज्वारीसाठी तसेच वरई, नाचणी, राळा यांसारख्या आदिवासी क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पौष्टिक तृण धान्यासाठी देखील किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत विचार व्हावा, अशीही सूचनाही केली आहे....

बीड जिल्ह्याची लढत #नेते विरूद्ध #जनता अशीच झाली.

Image
ज्याला चंदनचोर म्हणून हिणवले... ज्याला बहुरंगी म्हणून हिणवले... तो शेतकरी पुत्र बीडचा खासदार झालाय..! बीड जिल्ह्याला एक शेतकरी पुत्र खासदार मिळाला याचा मनापासून अभिमान वाटतो. एका बाजूला जिल्ह्यातील ए टु झेड नेते तर दुसऱ्या बाजूला शेतकरी पुत्र आणि सामान्य जनता होती. बीड जिल्ह्याची लढत #नेते विरूद्ध #जनता अशीच झाली.  निवडणूक लागल्यापासून बातम्या आणि वृत्तपत्रातून खूप वाचत होतो. शेतकरी पुत्र ताकदीने लढताना पाहून अनेकदा ह्रदय भरून आले. बाप लेकीचा तो विडिओ पाहून गहिवरलो. या निवडणूकीत आम्ही प्रत्यक्ष नव्हतो. पण झुंजारपणे लढणारा शेतकरी पुत्र पाहून वाटायचे हा माणुस जिंकणार! बीडच्या सभेत बप्पांनी #सगेसोयरे मागणी जाहीरपणे मांडली. राजकारण करताना काही निर्णय खूप धाडसी असतात. एका फाटक्या माणसाने हे धाडस दाखवले. त्याची परतफेड मतपेटीतून नक्कीच झाली. बप्पा... दिलेल्या शब्दावर ठाम रहा. बीड जिल्ह्याचा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागास लोकांचा जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी अस्सल मराठीतून संसद गाजवा. तुमच्या कार्यकाळात रेल्वे आणा... तूर्तास एवढेच!  बप्पांचे अभिनंदन! Bajrang Sonwane 

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख...

Image
#अभिष्टचिंतन  जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख... धेय्यासक्त व्यक्तिमत्व संजय मालाणी ---       एखाद्या विषयात 'अभ्यास' करून एखाद्या धेय्याची निश्चिती करायची आणि मग त्यासाठीचा पाठपुरावा करायचा, त्यासाठी प्रसंगी कोणाचाही विरोध सहन करण्याची तयारी ठेवायची, कोणताही संघर्ष करण्याची तयारी ठेवायची पण ते धेय्य साध्य करायचेच असे व्यक्तिमत्व म्हणून माजी विधिमंडळ सदस्य अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहता येईल. बीड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचा विषय असेल किंवा शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अमरसिंह पंडित यांची भूमिका नेहमीच आठवणीत राहील अशी राहिली आहे. --- मुंबईमध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकारांसोबत ज्यावेळी बोलणे झाले, विशेषतः विधिमंडळ वृत्तांकन करणारे पत्रकार ज्यावेळी भेटतात, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीची आठवण ते हमखास काढतात, ती व्यक्ती म्हणजे अमरसिंह पंडित. राज्य विधिमंडळाचे माजी सदस्य ( विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात त्यांनी काम केल...

"महाराष्ट्राची लालपरी "एसटी"चा प्रवास आता ‘कॅशलेस"

Image
"महाराष्ट्राची लालपरी "एसटी"चा प्रवास आता ‘कॅशलेस" मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नव्हती तोपर्यंत बाजारात सुट्या पैशांचा मोठा प्रश्न होता. सुट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये सतत वाद होत होते. हा वाद टाळण्यासाठी एसटीमध्ये कृपया सुटे पैसे देऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केलेले वाक्य होते. तरीही सुट्या पैशांमुळे वाद होत होते. महामंडळाने एसटीच्या प्रवासात युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा देत सुट्या पैशांचा प्रश्नच निकालात काढला आहे. कोणतेही व्यवहार करताना सध्या ते रोख न करता कॅशलेस केले जात आहेत. मोबाईलवरुन कितीही मोठे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे रोकड जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यातूनच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या प्रवासात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत तिकिटासाठी रोख रक्कम द्यावी लागत होती. 7 डिसेंबर 2023 पासून महामंडळांने प्रवासाच्या तिकिटाचे पैसे युपीआयद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आज 14 मे 2024 ला युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देऊन अनुभव घेतला.त्यामुळे आता एसटीचा प्रवासही कॅशलेस झाला आहे.अधिक...

निरागस आणि मनातल्या रामा सोबतं इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..

Image
निरागस आणि मनातल्या रामा सोबतं इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं.. साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, *"व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.* मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं. *आरं देवा... मंग तिकीट??* त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय. *मग आता???* "तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही." *"दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.* *त्ये मरुदे त...

■■ *स्वतःला सांभाळूनच दुसर्‍याला यश* ■■

■■ *स्वतःला सांभाळूनच दुसर्‍याला यश* ■■ °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° कुकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली चटकन उठायचं पटकन धावायचं झटकन वळायचं लगबग करायची हे माझ्या अंगातच. मुद्दाम नाही करत. आपोआपच होतं.  आई तर म्हणायचीच ," अगं अगं आपटशील!"  आणि खरोखरच घरातील कधीही न हालणार्या वर्षोनुवर्षं एकाच जागी स्थीर असणार्या भिंती कपाट अशांवर ही मी आदळायची. हळूहळू माझं वय वाढलं. ओरडायला आई पण राहिली नाही.  एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते. फोन ची रिंग वाजली. तेव्हा land line phone होते. मी ताडकन उठले फोन कडे धावले आणि गुढग्यातून कट्टकन आवाज झाला. एक पाऊल टाकता येईना. हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं. घरात अडकले. हालचालींवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणा मुळे! ज्याची काहीच गरज नव्हती. मी हे सर्व संथपणे करु शकले असते. आपला job मुलं बाळं सांसारिक जबाबदाऱ्या धावपळीचं आयुष्य मल्टी टास्किंग ह्यामुळे आपल्या शरीराला काही सवयी आपोआप पडलेल्या असतात काही आपण प्रयत्नाने अंगी बाणवलेल्या असतात. वय वाढत गेल्यावर ह्यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात पण आपल्या सव...