एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या समवेत उपस्थित राहून सर्व प्रतिनिधींशी व उपस्थितांशी संवाद साधला.
आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या घटक राज्यांची परिषद संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या समवेत उपस्थित राहून सर्व प्रतिनिधींशी व उपस्थितांशी संवाद साधला. विविध राज्ये पिकांची किमान आधारभूत किंमत किती असावी, याच्या शिफारशी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाकडे करतात. मात्र त्यात तफावती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे त्यात सुसूत्रता व एकवाक्यता आणणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेत असून, त्यादृष्टीने आज आयोजित करण्यात आलेली परिषद अत्यंत महत्वाची आहे. सर्व राज्यांनी मिळून समन्वयातून विविध पिकांच्या आधारभूत किमतींच्या शिफारशी एकत्रित व समसमान तसेच शेतकऱ्यांचा लाभ विचारात घेऊन केल्याने सर्व संबंधित राज्यांना फायदा होईल, असे आवाहन यावेळी केले. ही परिषद ऐतिहासिक ठरणार असून, रब्बी ज्वारीसाठी तसेच वरई, नाचणी, राळा यांसारख्या आदिवासी क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पौष्टिक तृण धान्यासाठी देखील किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत विचार व्हावा, अशीही सूचनाही केली आहे....