"महाराष्ट्राची लालपरी "एसटी"चा प्रवास आता ‘कॅशलेस"
"महाराष्ट्राची लालपरी "एसटी"चा प्रवास आता ‘कॅशलेस" मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नव्हती तोपर्यंत बाजारात सुट्या पैशांचा मोठा प्रश्न होता. सुट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये सतत वाद होत होते. हा वाद टाळण्यासाठी एसटीमध्ये कृपया सुटे पैसे देऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केलेले वाक्य होते. तरीही सुट्या पैशांमुळे वाद होत होते. महामंडळाने एसटीच्या प्रवासात युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा देत सुट्या पैशांचा प्रश्नच निकालात काढला आहे. कोणतेही व्यवहार करताना सध्या ते रोख न करता कॅशलेस केले जात आहेत. मोबाईलवरुन कितीही मोठे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे रोकड जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यातूनच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या प्रवासात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत तिकिटासाठी रोख रक्कम द्यावी लागत होती. 7 डिसेंबर 2023 पासून महामंडळांने प्रवासाच्या तिकिटाचे पैसे युपीआयद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आज 14 मे 2024 ला युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देऊन अनुभव घेतला.त्यामुळे आता एसटीचा प्रवासही कॅशलेस झाला आहे.अधिक...