नाथा पुरे आतामराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावाक्रॉसलाईन दैनिक लोकाशा
नाथा पुरे आता मराठ्यानो ओळखा सत्तेचा गनिमी कावा क्रॉसलाईन दैनिक लोकाशा एकनाथ शिंदे शेवटच्या भाषणात कामाचे बोलतील असा कयास अर्थात अंधश्रद्धा मिडिया सह समाजाला होती , जरांगे गेली अनेक महिने सरसकट प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत आहेत , मात्र ४४ मिनिटांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सरसकट कुठलाही शब्द वापरलेला नाही , न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल प्राप्त आणि कायदेशीर बाबी तपासून लवकर स्वीकारेल अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली , आणखी एक फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेऊ असे एक ते म्हटले . हो न , त्यांनी परवाच्या भाषणात कुणबीचा कुठलाही आकडा सांगितला नाही , यातून ओबीसी मध्ये किती मराठे जाणार हे नक्की नाही . कारण या शिवाय कुणाचीही भीती किवा आक्रमण निश्चित होणार नाही . ५४ लाख नोंदींचा आकडा आत्ताचा नाही तर एकुन चा आहे , या तीन महिन्यात २८ ते २९ हजार नोंदी मिळाल्या आहेत , हे बहुतेकांना माहित नाही . अनेकांनी असे समजून घेतले कि शिंदे यांनी शब्द पाळला आहे मात्र इतर जातींना वंशावळ दाखवली कि काष्ठ निघते , तर त्या नियमाने नोंदी सापडलेल्या वंशात देखील कुणबी द्याव असे म्हणणे समोर आले आह...