Posts

भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये लवकरच एक नवीन प्रवेशिका दिसू शकते: देशातील सर्वात मौल्यवान फर्म.

Image
भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये लवकरच एक नवीन प्रवेशिका दिसू शकते: देशातील सर्वात मौल्यवान फर्म. TechCrunch द्वारे पुनरावलोकन केलेल्या दस्तऐवजांनुसार, रिलायन्स स्वदेशी RuPay नेटवर्कवर दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी राज्य-समर्थित कर्जदार SBI सोबत काम करत आहे. रिलायन्स एसबीआय कार्ड नावाची कार्डे रिलायन्स रिटेलसाठी व्हाउचर (समूहाची किरकोळ साखळी) आणि ट्रेंड्स, अजिओ, जिओमार्ट आणि अर्बन लॅडरसह इतर रिलायन्स मालमत्तांवरील खर्चावरील सवलत यासारखे काही "विशेष" फायदे ऑफर करतील. कागदपत्रे. SBI ने एका वेब पेजवर कार्डच्या अस्तित्वाची थोडक्यात पुष्टी केली जी त्यांनी काढून टाकली आहे. क्रेडिट कार्ड व्यवसायात रिलायन्सची स्वारस्य अशा वेळी येते जेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, रिलायन्स-समर्थित फायनान्स युनिटने कर्ज देणे आणि विमा व्यवसाय सुरू केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वार्षिक अहवालात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना असल्याचे सांगितले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्री...

'बाप म्हणजे मित्र'

'बाप म्हणजे मित्र' ************* बापाचं पायतान मुलाच्या पायात जातं तेंव्हा बाप त्याच्या खांद्यावर हात ठेऊन पावले पुढे टाकतो म्हातारपणाची काठी होण्याचा आधार त्याला वाटतो म्हातारपणाची काठी कधी निसटून जाते काहीच कळत नाही आतल्याआत जळणारा बाप मात्र दिसतं नाही प्रत्येक बापाला मुलगा मित्रासारखा असतो त्याचासारखा मित्र दुसरा कोणी नसतो पण चार मित्रांचे हात गळ्यात पडतात तेव्हा बापाचा हात सुटतं रहातो हुळू हुळू बाप मागे पडतं जातो मागे वळून बघण्याची तो तसदी घेत नाही  मित्रांच्या गर्दीतले हरवलेले पाय बापाकडे वळत नाही खूप प्रेम करतो बाप आपल्या मुलावर पण ते दिसतं नसतं बापाला मुलाच ओझं कधीच वाटत नसतं  वेदना यातना सहण करूनही बाप डोळ्यातून अश्रू येऊ देत नाही बापाने मारलेली मिठी सैल झाल्यावर ती पुन्हा घट्ट होत नाही बापाला फक्त मुलाच्या चेहऱ्यावर  एक स्माईल हवत असतं कारण त्याच्याशिवाय बापाचं जगणं नसतं बापाची पावले पुसून  मुल दुरं निघून जातात पुन्हा मागे फिरत नाही चार भिंतीच्या घरातं  बापाशिवाय कोणी रहात नाही कष्ट करून बापाने मुलाला मोठ करायचं आणि मुलाच्या आठवणीत एकांतात रडून घ्यायचं...

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र !

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,   सस्नेह जय महाराष्ट्र !   इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.   तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. ...

तोंडातला घास तोंडातच राहिला आणि डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहू लागले.

तोंडातला घास तोंडातच राहिला आणि डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहू लागले. नवीनच लग्न झालेला बंटी, जेवणाचा पहिल्या घास गिळता गिळताच रडू लागला. पण पंचाईत बिचाऱ्या बंटीच्या बायकोची झाली. अंगाने सडपातळ, उंचीने थोडी छोटी, गहू वर्ण, लांबसडक केस असणारी, काळेभोर आणि बोलक्या डोळ्याची मीना पुरती गोंधळली, मीना आणि बंटीच लग्न होऊन ४ दिवस झाले होते. बंटीचा स्वभाव तिच्यासाठी नवीन होता. पूजा आणि देव देव कालच पार पडले होते. सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे आज घरात बंटी आणि मीना दोघेच होते. पण बंटीच्या पानावलेल्या डोळ्यांमुळे मीनाला प्रश्न पडला.  तीच काही चुकलं असेल का? तिने गोंधळलेल्या आवाजात, गालावर येणारी बट डाव्या हाताने कानामागे सारत, विचारलं  "काय हो काय झालं? भाजी तिखट आहे का? डोळ्यात पाणी का तुमच्या?" तसे बंटीने स्मित हास्य केलं. आणि मीना अजूनच गोंधळली. तिने बंटीच्या बाजूला बसता बसता विचारलं  "मग काय झाल? डोळ्यात पाणी का?" बंटी पाणावलेले डोळे पुसत, नजर चोरत म्हणाला "कुठे रडतोय, काहीच नाही" तशी मीना म्हणाली "अहो आपलं नवीन लग्न झाल असल, तरी माझ्या येत लक्षा...

*साबळेचा सापळा*स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ?*क्रॉसलाईन*

Image
*साबळेचा सापळा* स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ? *क्रॉसलाईन* दैनिक लोकाशा  आरक्षणाचे आंदोलन त्या गुणरत्नेच्या भोवती घोंगावे अशी कुणाची तरी इच्छा नक्की आहे , मुळात जे काही चालले आहे ते आरक्षणासाठी का हिरोगिरी साठी आहे हे कुणीतरी समजावून सांगितले पाहिजे , ओबीसी मधून आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले ५० टक्केच्या अधिकचे आरक्षण , या मुद्द्याचा आणि वर्तमान आंदोलन मार्गाचा मेळ जुळत नाही , जे काही दिसते दाखवले जात आहे ते केवळ मराठ्यांना जातीवादी हिंसक भासवून ओबीसी समुदायात भयाची निर्माणमशागत चालू आहे , पैसे उधळणारा मंगेश साबळे पंचायत समिती समोर निरागस वाटला , मात्र मागास आहोत म्हणून आरक्षण मागणाऱ्या आंदोलनात चार चाकी जाळणाऱ्या साबळेची कीव येते , स्टट करून वेगळेपण सिद्ध होईल मात्र त्यातून मागण्या पदरात पडतात असे नाही . मराठा आरक्षण आंदोलनात अनेकांनी आपआपले गेन घ्यायला सुरवात केली आहे , जरांगे हे निरागस असले तरी त्यांच्या आंदोलनात भाजप जसे लोणी काढत आहे तसे आता अनेकांनी या तापलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या शेकायला सुरवात केली आहे , त्यातलाच एक मंगेश साबळे . मनोज जरां...

रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना

Image
रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी मी थांबलो होतो.  पेट्रोल पंपाच्या पुढे एका मंडळाच्या नवरात्रीच्या कार्यक्रमात तरुण तरुणी हिंदी गाण्यावर नृत्य करत होते आणि एकीकडे या भगिनी आपल घर-कुटुंब चालवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील छोट्या खेड्यातून येवून..संघर्ष करत..रणरागिणी सारखे हिमतीने पेट्रोल पंपावर काम करत आहेत. मला वाटलं मला साक्षात देवीचे दर्शन झाले आहे. त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो घेतला आणि पुढे निघालो. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने आपल्या कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व माता-भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात.🙏

#दुर्दैवहिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा

Image
#दुर्दैव हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला अस...