Posts

रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना

Image
रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी मी थांबलो होतो.  पेट्रोल पंपाच्या पुढे एका मंडळाच्या नवरात्रीच्या कार्यक्रमात तरुण तरुणी हिंदी गाण्यावर नृत्य करत होते आणि एकीकडे या भगिनी आपल घर-कुटुंब चालवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील छोट्या खेड्यातून येवून..संघर्ष करत..रणरागिणी सारखे हिमतीने पेट्रोल पंपावर काम करत आहेत. मला वाटलं मला साक्षात देवीचे दर्शन झाले आहे. त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो घेतला आणि पुढे निघालो. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने आपल्या कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व माता-भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात.🙏

#दुर्दैवहिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा

Image
#दुर्दैव हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला अस...

"ताई कितीला दिला हा फडा?"" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"

Image
"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला  "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?"  " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून"  मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला.  रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे.  " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले"  "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही "  त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज.  परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भ...

*दर्प नको संघर्ष हवा*मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...*

Image
*दर्प नको संघर्ष हवा* मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...* *क्रॉसलाईन* तोंडातला घास बाहेर काढला तर तळपायाची मस्तकाला जाते , आरक्षणाचा घास तर पोटात पोहचला होता , तोफा झडून झाल्या होत्या , केवळ पाटलांचे नावे घेऊन सगळ्या मराठ्यांचे भले समजण्याची चूक व्यवस्थेने केले आणि त्यात गरजवंत मराठा पाटलांच्या नावाखाली दारिद्र्याच्या खाईत खीपचत पडला , सराटीत आलेला लक्षावधीचा होन जरांगेने आणलेला नव्हता जरांगेच्या निमित्ताने जमलेला होता , परवाची सभा नव्हती मराठ्यांचा इज्तेमा होता , पोटासाठी आणि जातीसाठी गावची गाव उतरली होती , कुणाला तरी शिव्या द्यायच्यात किवा कुठल्या इतर जातीच्या नावाने द्वेष त्या गरीब मराठ्यांच्या मनात नव्हता नसेल , त्याला फक्त वाटले कि गेल्यावर मिळणार आहे , न्यायलयाची वाट बिकट त्यात सारे सराटे म्हणून सराटीचा पर्याय डोळे झाकून मराठ्यांनी स्वीकारला , चार दोन गाबडे हीट वाढवतात नाही असे नाही मात्र म्हणून धोतरातला विठोबा आणि फाटक्या लुगड्यातल्या रखुमाईची वारी होती ती . जरांगे यांना अभ्यास नाही मात्र ते निरागस आहेत , आणि त्यांचे निरागस असणे इतर अभ्यासू आणि धूर्त नेत्यांच्...

जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित==========जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न============================

Image
जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित ========== जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न ============================ गेवराई दि. १६ (प्रतिनिधी) चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करुन आपण गळीत हंगाम सुरु करत आहोत. अडचणीचा काळ असला तरी जय भवानी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे नियोजन करणार आहे, या हंगामात ऊसाला प्रती टन २७००/- रुपयाच्या पुढेच भाव असेल असा विश्वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ४१ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव दादा पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला. ...

गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा अमरावतीत |

गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा अमरावतीत | मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा वेळ दिला आहे. त्याला आज तीस दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सभा घेतली, या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. सभेत बोलताना जरांगे यांनी सरकारला 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लहनपणचा सिनेमा

Image
लहनपणचा सिनेमा . *********************** लहानपणी आमच्या शाळेसमोर, सिनेमावाला यायचा. पाचपैशात पंधरा मिनीटात, मुंबईला न्यायचा. वाघ सिंह हत्ती घोडे, सगळेच मधे असायचे. सगळं पहायला मात्र त्या वेळी, पाच पैसेच नसायचे. रडुन रडुन वडीला कडुन, पाच पैसे अनायचो. गुरुजींनी फिस मागितली असं, खोटं खोटं म्हणायचो. एव्हढ्याशा पेटीत वाघ सिंह, बसत असतील कसे. लहान सहान गोष्टीचं ही, केवढं कुतूहल असे. आता कितीतरी पिक्चर नुस्ते, डाउनलोड करता येतात. जसे पहायचे तसे किती ही, जोड तोड करता येतात. रहाट पाळण्याकडे नुसता मी, कुतुहलानं बघत राही. आता विमानात बसलं तरी ही, त्याचं काहीच वाटत नाही. विचार केला की नेहमी वाटतं, आता दिवस कसले आहेत. लहानपणचे ते प्रसंग काळजात, घर करुन बसले आहेत. हल्लीच्या या विज्ञान युगात, जुणं सगळं जळुन गेलं. माझ्या लहानपणा सोबतच, कुतुहलही पळुन गेलं. आता नेहमी मला वाटत राहतं पुन्हा एकदा लहान व्हावं । पोट दुखायचं निमीत्त करुन, शाळे मधुन पळुन यावं.