*दर्प नको संघर्ष हवा*मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...*
*दर्प नको संघर्ष हवा* मराठ्या लई भोगलस आजवर ,*वाट चुकू नगस ...* *क्रॉसलाईन* तोंडातला घास बाहेर काढला तर तळपायाची मस्तकाला जाते , आरक्षणाचा घास तर पोटात पोहचला होता , तोफा झडून झाल्या होत्या , केवळ पाटलांचे नावे घेऊन सगळ्या मराठ्यांचे भले समजण्याची चूक व्यवस्थेने केले आणि त्यात गरजवंत मराठा पाटलांच्या नावाखाली दारिद्र्याच्या खाईत खीपचत पडला , सराटीत आलेला लक्षावधीचा होन जरांगेने आणलेला नव्हता जरांगेच्या निमित्ताने जमलेला होता , परवाची सभा नव्हती मराठ्यांचा इज्तेमा होता , पोटासाठी आणि जातीसाठी गावची गाव उतरली होती , कुणाला तरी शिव्या द्यायच्यात किवा कुठल्या इतर जातीच्या नावाने द्वेष त्या गरीब मराठ्यांच्या मनात नव्हता नसेल , त्याला फक्त वाटले कि गेल्यावर मिळणार आहे , न्यायलयाची वाट बिकट त्यात सारे सराटे म्हणून सराटीचा पर्याय डोळे झाकून मराठ्यांनी स्वीकारला , चार दोन गाबडे हीट वाढवतात नाही असे नाही मात्र म्हणून धोतरातला विठोबा आणि फाटक्या लुगड्यातल्या रखुमाईची वारी होती ती . जरांगे यांना अभ्यास नाही मात्र ते निरागस आहेत , आणि त्यांचे निरागस असणे इतर अभ्यासू आणि धूर्त नेत्यांच्...