Posts

#अभिमानास्पद....आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाने तब्बल 100 हून अधिक मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Image
#अभिमानास्पद.... आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाने तब्बल 100 हून अधिक मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नेत्रदीप कामगिरी करून सिंहाचा वाटा उचलला. खेळाडूंची ही कामगिरी जागतीक स्तरावर देशाचा अभिमान उंचावणारी आहे.  पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रची कन्या आदिती स्वामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावेल असा विश्वास व्यक्त केला होता. तो विश्वास तिने सार्थ ठरवला. उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याबद्दल तिचे व पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन ....💐

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार

Image
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज बीड येथे जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या कामकाजाचा समग्र आढावा घेतला.  जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यातील उपलब्ध औषध साठा तसेच त्या औषध साठ्यात कुठेही कमतरता भासणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.  आगामी काळातल्या पाणीटंचाई, चारा टंचाई, भूमी अधिग्रहण तसेच जलस्रोतांचे अधिग्रहण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून हाती घ्यावयाची विशेष कामे, यांबद्दल सविस्तर सूचना केल्या आहेत.  आगामी रब्बी हंगामात पीक कर्जाचे उद्दिष्ट 700 कोटींवरून वाढवून 900 कोटी करण्यात आले आहे. सन 2022 मधील अतिवृष्टीचे व सन 2023 मधील अवकाळी पावसाचे अनुदान वितरण करण्यातील काही त्रुटी दूर करून शक्य तितक्या लवकर उर्वरित शेतकऱ्यांना 100% अनुदान वितरित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.  मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी या ...

ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " ................. तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,, " बिजलेला बाप " एक आठवण ............!!!

Image
ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " .................     तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,,                      " बिजलेला बाप "     एक आठवण ............!!! १९८४ साल उजाडलं आम्ही सर्वजन वाण्याच्या गुर्‍हाळावरचं राहु माधवनगरला रहात होतो . रखरखनारा उन्हाळासंपुन पावसाळा सुरु झालेला होता . जास्त पाऊस लागला तर गुर्‍हाळ चार-चार दिवस बंद रहायचे . आषाढ महीना संपुन श्रावणाचे आगमन झाले होते . पावसाळ्यात खुप पाऊस पडला तर सर्वञ चिखलाचे साम्राज्य पसरायचे . गुराढोरांना चारासुद्धा आणता येत नव्हता . अशातचं मंगलताईचं लग्न करायचं हे भाऊंच्या डोक्यात होतं . दिवाळी झाली व तुळशीचे लग्न झाले की देवू बार उडवून असे भाऊंनी मनोमन ठाणले होते .पैसा तर एक जवळ नव्हता ! वाण्याकडुन उचल घ्यायची म्हणलं तर वाणी उचल द्यायचे एक हजार .... ती फेडायला पुढं वर्ष जायचं ! उचल काय फिटत नसे पुन्हा कर्जाचा बोजा अंगावर रहायचा .                उचल आणणेसाठी 'बापुशेठ ' भाऊंना गावात ब...

*हुशार हो रं मराठ्या....*कमळाच्या बागेसाठी चिखल तुडवला जातोय .

Image
*हुशार हो रं मराठ्या....* कमळाच्या बागेसाठी चिखल तुडवला जातोय . उपोषण सोडले तरी जागा सोडणार नाही म्हणणारे जरांगे तालुकानिहाय मराठवाड्यात प्रचंड गर्दीच्या समोर दिसत आहेत , मुळात गर्दी मुळे सरकारवरचा दबाव वाढवला जातोय कि सरकारला सुरक्षित केले जातेय सहज समजणारा पेच आहे . शिंदेच्या हातानेच पाणी पिणारे जरांगे आता शिंदेची ढाल बनलेच आहेत , मुळात मराठ्यांची गर्दी महाराष्ट्राला नवी नाही , कुठल्याही नेत्या शिवाय लाखोंचे मोर्चे निघाले ते काही कुठल्या नेत्याच्या मागे नाही तर पोटाच्या गोळ्यासाठी , मात्र त्यातून त्या गरिबांना भेटले काय , मराठ्यांच्या गर्दीत आरक्षणाचे रक्षण झाले नाही मात्र त्या गर्दीच्या सूर्यफुलात क्रांतीसूर्य 'फुलले' उगले आणि मोठे झाले . जरांगे यांच्या समोरची गर्दी लेकरांच्या भविष्यासाठी आलीय , आजवर अनेकांच्या समोर येऊन बसली मात्र त्यांचा प्रश्न तसाच राहिला , याचा अर्थ गर्दीच्या समोर भाषन करणाराने त्यांना फसवले असे नाही , मुळात आरक्षण मिळण्याची मिळवण्याची रीत दिशा योग्य नसल्याने दशा झाली असेच निरक्षण आहे , गर्दी आणि तर्क यातला फरक उद्याची फसवणूक ठरत आलेली आहे ...

हरिनामाच्या गजराने गेवराई नगरी दुमदुमली .

Image
हरिनामाच्या गजराने गेवराई नगरी दुमदुमली . ================= शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त उन गेवराईत भव्य शोभायात्रा =============== *देखावे आणि वारकऱ्यांच्या दिंडीने गेवराई शहर झाले भक्तीमय* ================ गेवराई दि.४ (प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने गेवराई शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा आणि कीर्तन सोहळ्याचा प्रारंभ आज सकाळी भव्य दिव्य शोभायात्रेने झाला. भक्तीमय संदेश देणारे देखावे, दिंडी, हत्ती, घोडा आणि हरिनामाचा गजर करत वीस शाळेतील वारकरी या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेतील सजवलेल्या रथातून भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांची मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजराने शहर दुमदुमले दरम्यान या शोभायात्रेमुळे शहर भक्तीमय झाले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते रणवीर पंडित यांच्तयासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेवराई तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे...

गहाण ‘मिशी’

गहाण ‘मिशी’      खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता.     आमचा आजा सांगायचा.आसाचं गावात एकदा एक रोह्यल्या पहिलवान आलता.दुसर्‍या मुलखातुन येवुन त्यो रोह्यल्या याजबट्ट्याचा धंदा करायचा.आमच्या गावातबी त्या रोह्यल्यानं याजानं पैकं वाटलेले व्हते.आज त्यो रोह्यल्या वसुलीलं आलता.पावसानं साथ न देल्यानं त्यासाली कुणबीक पिकली नवती.रोह्यल्याच्या दहशतीखाली लोकं रानावनायत जाऊन लपून बसले व्हते.ईकडं घरोघर जाऊन रोह्यल्या बायका पोरायलं धमकाऊ लागला.सगळं गावं ना...

भाकर -तुकडा टाकायची ऐपत नसेल,तर,, मारत पण जाऊ नका,,,,

Image
भाकर -तुकडा टाकायची ऐपत नसेल,तर,, मारत पण जाऊ नका,,,, नाही बनवता येत मला जेवन ,,,फुकट तुझ्याकडे भाकर नाही मागत,,,तुझ राञभर राखन करतो ,, ..रे,,,तु जे शिळपाक देतो ना त्यातच मला समाधान आहे रे, पोटात तर खुप भुकेची आग लागली आसते पन भाकरीच्या तुकड्यातच समाधान मानतो भुकेच्या वेदना सांगुसी वाटतात,,पन समजत नाही कोनाला..तुकडा पन कधी कधी नशिबात नसतो,, येवढा का तुम्ही लोक माझा तीरस्कार करता,,,पोटच्या पोरांची खळगी भरवण्यासाठी राब राब दारो दारी हींडावा लागत,,,लोकांची दगड खाऊन लंगत लंगत माझ्या पील्लांची पोट भरवावा लागत,,,😥😥