*पोहोचलो रे , पेताडांनो*पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*
*पोहोचलो रे , पेताडांनो* पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन* पार्वती मातेने मला झोडपून काढले , गण्या म्हणू म्हणू माझी टीर लाल केली . असेच पूर्वी कधीच झाले नव्हते , अंगावर गुलाल म्हणावा तर प्रत्येक वर्षी गुलाल असायचा , मग याच वर्षी असा प्रसाद का मला काही कळेना , म्हणे तुला मोदक खायला पाठवले होते का दारू प्यायला , मी म्हटलो नाही मी नाही पिलो तर तिने पितांबर अंगावर फेकून विचारले , वास घे . पितांबर नाकाला लावला आई शपथ . यावर्षी पत्ते खेळणारे भक्त चक्क दारूत माझ्या मिरवणुकीत होते , माझ्या लक्षात आले अरा अरा कहार येताना झालाय . माझ काही नाही मी तुम्हाला नेहमी एड्जस्ट करत आलोय रे , मात्र दारू म्हणजे जास्तच होतेय . लई हिंदू हिंदू करता , कुणी आपल्या देवाला दारू पिऊन भंजते का , इथे नाही का हिंदुत्व खतऱ्यात , काय दिवस होते राव ते , गणपती मेळे असायचे लोक जात धर्म विसरून जायचे आता मात्र जात निहाय गणपती असतात , साळी गल्लीचा गणपती , कोळी गल्लीचा राजा , लालबाग चा राजा , सगळ तुमच्या साठी असते माझ्या साठी काही नसते . ज्या लेकरांना समज यायची म्हणजे १० व...